Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»वाहतूक नियम मोडणाऱ्या ६३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
    जळगाव

    वाहतूक नियम मोडणाऱ्या ६३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वाहतूक नियम मोडणाऱ्या ६३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

    जळगाव शहरात वाहतूक शाखेची विशेष मोहीम

    जळगाव प्रतिनिधी – शहरातील वाहतूक शिस्तीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी बुधवारी विशेष मोहीम राबवत वाहतूक नियम मोडणाऱ्या ६३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. याशिवाय परवाना नसताना दुचाकी चालवणारे १५ अल्पवयीन मुलांना दुचाकीसह वाहतूक शाखेत आणून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली.

    जळगाव शहरात विना हेल्मेट, ट्रिपल सीट, विना परवाना तसेच इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने शहरातील विविध भागात तपासणी मोहीम राबवली.

    दरम्यान, महाविद्यालये व क्लासेस परिसरातही विशेष लक्ष ठेवत अल्पवयीन दुचाकीस्वारांना रोखण्यात आले. एकूण १५ मुलांना दुचाकीसह पोलिसांनी वाहतूक शाखेत आणून त्यांच्या पालकांना पाचारण केले. पहिल्यांदाच नियमभंग झाल्याने त्यांना समज देऊन सोडण्यात आले.

    वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही नियमित कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

    Jalgaon City triple seats without helmets without licenses
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif