जिल्ह्यात १८७ कुष्ठरोगी

0

जिल्ह्यात १८७ कुष्ठरोगी

३५ लाख नागरिकांची तपासणी

जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या काळात राबविण्यात आलेल्या व्यापक कुष्ठरोग रुग्ण शोध मोहिमेत तब्बल ३०५९ टीमद्वारे घरोगरी सर्वेक्षण करण्यात आले. या मोहिमेत १८७ नवीन कुष्ठरोग रुग्णांचा शोध लागला असून आरोग्य विभागासाठी ही मोहीम यशस्वी ठरली आहे.

या मोहिमेत आशा सेविका, पुरुष स्वयंसेवक, आरोग्य सेवक अशा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सर्वेक्षणावर नियंत्रण व देखरेखीसाठी जिल्ह्यात ६२४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमध्ये ३५ लाख ०९ हजार ७८८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

२ डिसेंबरपर्यंत ७ लाख १३ हजार ५५६ घरांना प्रशिक्षित टीमकडून भेटी देण्यात आल्या, ज्यातून ३४ लाख २० हजार ७१९ नागरिकांची तपासणी झाली. या तपासणीतून मिळालेली १८७ रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकरिता महत्त्वाची असल्याचे सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. इरफान तडवी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.