Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»केंद्र सरकारच्या कामगारविरोधी निर्णयांचा निषेध; कामगार संघटनांतर्फे निदर्शने
    गुन्हे वार्ता

    केंद्र सरकारच्या कामगारविरोधी निर्णयांचा निषेध; कामगार संघटनांतर्फे निदर्शने

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 27, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    केंद्र सरकारच्या कामगारविरोधी निर्णयांचा निषेध; कामगार संघटनांतर्फे निदर्शने

    जळगाव प्रतिनिधीकेंद्र सरकारने विद्यमान २९ कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी ४ नवीन श्रम संहितांची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील विविध कामगार संघटना तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात उतरल्या आहेत. या निर्णयामुळे कामगारांचे हक्क बाधित होणार असल्याचा आरोप करत जळगाव वर्कर्स संघटनेतर्फे २७ नोव्हेंबर २०२५ रोजी निदर्शनेकरण्यात आले.

    कामगारांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी दोन्ही संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या श्रम संहितांचा निषेध करून कामगार संघटनांनी प्रचंड घोषणाबाजी केली. ‘कामगार विरोधी कायदे मागे घ्या’, ‘श्रम संहितांची होळी करा’, ‘कामगारांचा विश्वासघात चालणार नाही’ अशा घोषणा देण्यात आल्या.

    निदर्शनादरम्यान ४ श्रम संहितांची प्रतीके जाळून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. नवीन संहितांमुळे कामगारांचे संरक्षण कमी होणार असून मालक-धार्जिणे तरतुदी वाढवल्या गेल्या आहेत, असा आरोप संघटनांनी केला. या निर्णयामुळे असंख्य कंत्राटी व बांधकाम कामगारांचे हक्क धोक्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

    या प्रसंगी विजय पवार, ताराबाई महाजन, निर्मला भावसार , रविंद्र फुलमाळी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारने रद्द केलेले २९ कामगार कायदे तत्काळ पूर्ववत करावेत व कामगार विरोधी ४ श्रम संहितांचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif