जळगाव एमआयडीसीतील ढोर बाजराजवळ सात दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली
लाखो रुपयांच्या मुद्देमालासह रोकड लांबविली ; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या ढोर बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास सात दुकानांना लक्ष्य करीत रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला चा प्रकार आज सोमवार रोजी सकाळी उघडकीस आला असून त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताचपोलआहे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे,पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या पथकाने धाव घेऊन पाहणी करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी किती रुपयांचा ऐवज लंपास केला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, काशिनाथ लॉज मागे असणाऱ्या एमआयडीसीतील ढोर बाजार येथे बी सेक्टर मध्ये सात दुकानांचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्यांनी दुकानांमधून रोकड आणि मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
दरम्यान या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले असून एमआयडीसी सारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारे चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी वर्गात आणि उद्योजकांमध्ये देखील खळबळ उडाली आहे.

