Sunday, May 29, 2022

सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे एक शाम लता दीदी के नाम

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

भारतरत्न, गान कोकिळा, भारतीय संगीत विश्वातले अर्ध्वर्यू स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांचे नुकतेच निधन झालेले असून दीदींनी संपूर्ण जीवनात अनेक अजरामर गीते म्हणून संगीत व गायन क्षेत्राला उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता परत दीदींसारखी गायिका होणे अशक्य आहे.

- Advertisement -

म्हणून दीदींना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, दीदींच्या आठवणी व कार्याला उजाळा देण्यासाठी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे एक शाम लता दीदी के नाम या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शनिपेठ पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी ए मेरे वतन के लोगो, जिंदगी प्यार का गीत है, जिंदगी जिंदगी प्यार का गीत है, लग जा गले, यह गलिया यह चौबारा, आज फिर जिने कि तमन्ना है, रंगीला रे तेरे रंग मे यु रंगा है यासह अनेक दर्जेदार गाणी यावेळी सादर करण्यात आली.

तसेच मुझफ्फर मास्टर (एम. कुमार), आरिफ शेख, शकील शहा या कलावंतांनी गीते सादर केली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सै. अयाज अली नियाज अली, शेख शफी, शेख सलीम, मुहम्मद खान उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण वाणी, सलमान मेहबूब, योगेश मराठे, अमोल वाणी, ओवेश शेख, आदिल गनी, नाझीम खाटीक, इलियास नुरी शेख अर्शद, शेख नझीरउद्दीन यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या