Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण
    अध्यात्म

    जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 4, 2025Updated:October 4, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण

    जळगाव प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉ. मोहित दीपक गादिया (वय २६, कनिष्ठ निवासी) यांना शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

    भादली येथून फटाका फुटल्यामुळे जखमी झालेले चार रुग्ण (महिला व पुरुष) उपचारासाठी आले होते. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी अत्यावश्यक विभागात प्रचंड गर्दी केली होती. डॉ. मोहित गादिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना “गर्दी करू नका, बाहेर जा, आम्हाला उपचार करू द्या” असे सांगितले. याचा राग आल्याने नातेवाईकांनी डॉ. गादिया यांच्या कानशिलात लगावली. त्यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतर डॉक्टरांनी धाव घेऊन डॉ. गादिया यांना सोडवले. या हल्ल्यामुळे डॉ. गादिया यांच्या कानाचा पडदा फाटला असून, त्यांना काही आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. रात्री ११ वाजता या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif