Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बेरोजगारीच्या तणावातून जळगावात तरुणाची स्वतःला पेटवून आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    बेरोजगारीच्या तणावातून जळगावात तरुणाची स्वतःला पेटवून आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 4, 2025Updated:October 4, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बेरोजगारीच्या तणावातून जळगावात तरुणाची स्वतःला पेटवून आत्महत्या

    जळगाव प्रतिनिधी Iराधाकृष्ण नगरात गुरुवारी (२ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी ६ वाजता बेरोजगारीच्या तणावातून सुरेंद्र रामसिंग चौधरी (वय ३३) या तरुणाने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु गंभीर जखमांमुळे रात्री ११ वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून, बेरोजगारीच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले गेले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र हा त्याच्या आईसोबत राधाकृष्ण नगरात राहत होता. नोकरी नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. घटनेच्या दिवशी दसऱ्याच्या निमित्ताने त्याची आई दुर्गोत्सवासाठी बाहेर गेली होती. यावेळी घरी एकटाच असताना सुरेंद्रने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. आग लागल्याने तो ओरडत रस्त्यावर धावला. स्थानिक तरुणांनी तातडीने आग विझवून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

    डॉक्टरांनी उपचार सुरू केले, परंतु गंभीर जखमांमुळे रात्री ११ वाजता सुरेंद्रचा मृत्यू झाला. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पोलिस तपास करत आहेत

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif