Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    • जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव
    • काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»मान्सूनपूर्व तयारीसाठी सर्व विभागांनी सतर्क राहा
    जळगाव जिल्हा

    मान्सूनपूर्व तयारीसाठी सर्व विभागांनी सतर्क राहा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 21, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मान्सून काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभ क्षेत्र प्राधिकरण कडा गणेश भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नरवीर रावळ, उपआयुक्त महानगरपालिका गणेश चाटे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अदिती कुलकर्णी, शहर अभियंता मनीष अमृतकर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहायक नासिदूल इस्लाम आदी अधिकारी उपस्थित होते.

    बैठकीत हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणातून विसर्ग नियंत्रित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूर निवारणासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नद्यांमधील गाळ तात्काळ काढून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी, अशी सूचनाही देण्यात आली. नदीवरील पूल सुरक्षित राहतील यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले.

    जिल्हा परिषदेने शाळांची दुरुस्ती करावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध साठा, रुग्णवाहिका व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांची तयारी तपासावी.

     

    अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ काढण्याचे आदेश

    पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यासंदर्भात सर्व नगरपालिका प्रशासनांनी सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

    महावितरणने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ‘आपदा मित्र’ म्हणून प्रशिक्षण देऊन आपत्ती व्यवस्थापन किट उपलब्ध करून द्यावेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व विभागांना वितरित करण्यात आलेले शोध व बचाव साहित्य तपासून सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात 24×7 नियंत्रण कक्ष सुरू करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026

    परिसरात वीज गेली म्हणजे संपर्क तुटला!

    October 11, 2026

    लोहारा येथील दिव्यांग इसमाचा सुरत येथे मृत्यू

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif