Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात इंजेक्शने घेतला दोन बालकांचा जीव
    जळगाव

    जळगावात इंजेक्शने घेतला दोन बालकांचा जीव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 22, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव शहरातून धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील जावळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना इंजेक्शन दिल्यानंतर मुलांची प्रकृती गंभीर होऊन त्यात दोन बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही दान्ही मुले सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रासलेली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

     

    नेमकं काय आहे प्रकरण ? 

    जळगाव शहरात सेरेब्रल पाल्सी आजाराजावर उपचार घेण्यासाठी जावळे रुग्णालयात आले. दोन्ही बालकांना इंजेक्शन दिल्याने दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंजेक्शन दिल्यानंतर साधारणतः चार तासानंतर दोन्ही बालकांना त्रास झाला. यात एका बालकाचा 18 एप्रिल रोजी तर दुसऱ्या तीन वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान 20 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे.एका बालकाच्या याबाबत पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली असून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. ज्या इंजेक्शनमुळे हा प्रकार घडला, संबंधित कंपनीला सूचना देऊन राज्यभरात ज्या त्यांनी इंजेक्शन वितरित झाले त्याचा वापर थांबवल्याबाबत तसेच तपासणीबाबत सूचना दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सेरेब्रल पाल्सी या आजाराच्या या दोन्ही बालकांवर उपचार करत असताना त्यांना butox सह भूल देण्याचे इंजेक्शन तसेच अनेक औषधी दिली आहे, यातील कोणत्या इंजेक्शन मुळे ही अक्षम आली हे सांगणे कठीण आहे , शुद्धीवर आल्यावर चार तासानंतर दोघा बालकांची प्रकृती गंभीर झाली. एकाचा रुग्णवाहिकेत तर दुसऱ्या बालकाचा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याबाबत आम्ही सुद्धा शॉक मध्ये असून पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर कारण कळू शकेल. असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

     

    काय म्हणाले डॉक्टर ?

    शहरातील जावळे हॉस्पिटल संचालक डॉ.हर्षल जावळे यांनी सांगितले की,  सेरेब्रल पाल्सी या आजारावर उपचारासाठी आलेल्या अडीच वर्ष आणि तीन वर्षीय बालकांना इंजेक्शन देण्यात आले होते. दोन्ही बालकांना एकाच प्रकारचे इंजेक्शन देण्यात आलेले butox नावाचे इंजेक्शन इंजेक्शनच्या संपूर्ण बॅच महाराष्ट्रातून परत मागविण्यात आल्याची माहिती डॉक्टर जावळेंनी दिली आहे .याप्रकरणात आम्ही हलगर्जीपणा केला असल्यास निष्पन्न झाले तर जी कारवाई होईल त्या कारवाईला सामोरे जाणार. दोघे बालकांना दिलेल्या एकाच प्रकारचे butox नावाचे इंजेक्शन देण्यात आले होते आणि या इंजेक्शनच्या बॅचमधील सर्व इंजेक्शन राज्यातून परत मागविण्यात आली आहेत.

    पोलिसांनी दिली माहिती 

    ज्या इंजेक्शन मुळे हा प्रकार घडला, त्या कंपनीला रिपोर्ट देत कळविण्यात आले आहेत. तसेच राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी ते वितरीत झाले आहे, त्यांचा वापर थांबविण्यात येईल तसेच त्याची तपासणी होईल असे सुद्धा डॉक्टरांनी सांगितले.बालकांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे, बालकाच्या पालकांनी केलेल्या आरोपानुसार योग्य तो तपास करून कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया, पोलिसांनी दिली आहे.

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif