महिलेच्या गळ्यातील सोनपोत धूमस्टाईलने लांबविली

0

महिलेच्या गळ्यातील सोनपोत धूमस्टाईलने लांबविली

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात पुन्हा एकदा धूमस्टाईल चोरीचा प्रकार समोर आला आहे. ११ एप्रिल रोजी रात्री बजरंग बोगद्याजवळ एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपयांची सोनपोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अनिता राजेंद्र जैन (वय ५५, रा. प्रेमनगर) या महिलेसोबत ही घटना घडली. त्या बजरंग बोगदा परिसरात भाजीपाला विक्री व किराणा दुकानाजवळून जात असताना, एक अज्ञात दुचाकीस्वार त्यांच्या पाठीमागून आला आणि गळ्यातील सोनपोत हिसकावून पळून गेला.

महिलेने आरडाओरड केली असली तरी चोरट्याने क्षणात पलायन केल्यामुळे तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निघून गेला. या घटनेनंतर अनिता जैन यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.