Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»औरंग्याची कबर हटवा ; विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
    ताज्या बातम्या

    औरंग्याची कबर हटवा ; विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 17, 2025Updated:March 17, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंग्याची कबर हटवा ; विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

    जळगाव प्रतिनिधी

    संपूर्ण भारतभर तसेच जळगाव मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आज दिनांक 17 मार्च सोमवार रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये क्रूर मुघल औरंगजेब याची कबर हटवण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.

    महाराष्ट्र ही पवित्र संतांची भूमी तसेच भारत देश हा सनातन संस्कृतीला मानणारा देश आहे या पवित्र भूमीवर अशा क्रूर मुघल औरंग्याची कबर असणे हे या देशासाठी अशोभनीय आहे.

    या क्रूर औरंगजेब याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची किती क्रूरपणाने हत्या केली तसेच गुरुगोविंद सिंग यांचे बाल साहेब जादे यांची भीतीमध्ये चिरून हत्या केली तसेच गुरु तेजबहादुर सिंग यांची देखील त्याने हत्या केली.

    काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले , मथुरे मध्ये असलेले सुंदर मंदिराचा विध्वंस यांनी केला. सोरटी सोमनाथ येथील मंदिर पुन्हा यानेच पाडले त्रंबकेश्वर जेजुरी अशा मंदिरांवर हल्ले केले. असंख्य हिंदूंवर धर्मांतरण करण्यासाठी हल्ले केले.

    अशा या क्रूर औरंग्याची कबर या पवित्र भारत देशामध्ये असणे म्हणजे देशामध्ये गुलामीचे प्रतीक असल्याचे भासते. म्हणून या आंदोलनाद्वारे शासनाला विनंती आहे की कायदेशीर रित्या प्रशासकीय बाबीनुसार या देशातून अशा क्रूर विकृतीचा विध्वंस करावा ही कबर त्या ठिकाणाहून हटवावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी असलेली औरंग्याची कबर या ठिकाणी कार सेवा करण्यास असंख्य हिंदू सोबत पोहोचेल आणि ती कबर उध्वस्त करेल.

    अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
    आंदोलनामध्ये व निवेदन सादर करताना योगेश्वरी गर्गे प्रांतमंत्री ,शांताराम  शिंदे विभाग मंत्री, देवेंद्रभावसार विभाग सहमंत्री, खंडुपवार जिल्हा उपाध्यक्ष,राकेश लोहार विभाग संयोजक, राजेंद्र गांगुर्डे जिल्हा सह मंत्री,संतोष पाटील शिवसेना शिंदे गट ,जितेंद्र मराठे भाजपा, पियुष कोल्हे , निलेश तायडे, मनोज बाविस्कर, सतीश गायकवाड व सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif