Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    • रस्त्यावर मृत अर्भक आढळल्याने जळगावात खळबळ
    • ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पुढे सरका म्हणताच वृद्ध महिलेचा संताप, महिला वाहकाला कडाडून घेतला चावा!
    गुन्हे वार्ता

    पुढे सरका म्हणताच वृद्ध महिलेचा संताप, महिला वाहकाला कडाडून घेतला चावा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 13, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुढे सरका म्हणताच वृद्ध महिलेचा संताप, महिला वाहकाला कडाडून घेतला चावा!

    जळगाव – बसमध्ये गर्दी असताना वाहकाने “पुढे सरका” असे सांगितल्याचा राग आल्याने एका वृद्ध महिलेने महिला वाहकाच्या हाताला कडाडून चावा घेत जखमी केले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी टॉवर चौकाजवळ घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव बसस्थानकातून नरगीस खलील मनियार (वय ३६, रा. एस.टी. कॉलनी) या महिला वाहक आणि बस चालक बापू बाबुराव कोळी हे आसोदा-जळगाव (MH-14 DT-2175) या बसने संध्याकाळी ५ वाजता मार्गस्थ झाले. बसमध्ये गर्दी असल्याने वाहकाने प्रवाश्यांना पुढे सरकण्यास सांगितले. मात्र, ७० वर्षीय सुशीला  शिरसाठ (रा. नांद्रा) या वृद्ध महिलेला हे बोलणे खटकले आणि त्यांनी अचानक महिला वाहकाला शिवीगाळ करत हुज्जत घालायला सुरुवात केली.

    किर्तनकारालाही धमकी

    बसमधील एका जेष्ठ किर्तनकार महाराजांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या वृद्ध महिलेने त्यांनाही चप्पल उगारून शिवीगाळ केली संतापाच्या भरात वृद्ध महिलेने महिला वाहकाचा हात घट्ट धरून पिरघळला आणि पंज्यावर जोरदार चावा घेतला, ज्यामुळे वाहकाच्या हातातून रक्तस्राव सुरू झाला. या घटनेने बसमध्ये एकच गोंधळ उडाला आणि बस चालकाने थेट बस शहर पोलिस ठाण्यात नेली.

    पोलिस ठाण्यात महिला वाहकाने संपूर्ण प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सुशीला शिरसाठ यांची चौकशी केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif