जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली गावात मध्यप्रदेशातील झिरण्या येथील एक कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून राहत आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर संशयित चमासिंग बिलाला (वय २२) याने अत्याचार केला.
या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर झाली आणि तिने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.