अधिकारी, कर्मचारी, कृषी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव !
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य : मान्यवरांची होती उपस्थिती
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, शेतकरी, खेळाडू, उद्योजक, वीरपत्नी, शिक्षक, व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते. त्यात पोलीस विभागात गुणवत्तापूर्ण सेवा व 15 वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तुकाराम शिवाजी निंबाळकर यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक प्रदान करण्यात आले.
वन विभागातील मानव व वन्यजीव संघर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वनपाल व वनरक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात विपूल पाटील, अजय महिरे, योगेश देशमुख यांचा उल्लेखनीय सहभाग होता. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वप्नील कैलास महाजन, उदय अनिल महाजन, रोशनी सलीम खान यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. जयंत भालचंद्र जाधव यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.उद्योग व कृषी विभागात चेतन चौधरी, अशोक गडे, सामाजिक कार्यात नरेंद्र पाटील यांच्या “मानव सेवा तीर्थ” संस्थेला भटकणाऱ्या अनाथ लोकांसाठी केलेल्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. शहीद सैनिक लान्सनायक कै. देविदास त्र्यंबक पाटील यांच्या पत्नी श्रीमती कल्पना देविदास पाटील यांना जमीन वाटपाचा सन्मान करण्यात आले.