जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. यात ठाकरेंनी आगामी वाटचालीबाबत त्यांच्याशी संवाद साधला.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख  संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. धरणगावहून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी काल रात्री येथून निघाले होते. पारोळ्याहून शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने तर पाचोर्‍याहून वैशालीताई सूर्यवंशी या देखील आज उपस्थित होत्या.

जळगाव महानगर कार्यकारिणीतील महत्वाच्या पदाधिकार्‍यांनीही आज उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यात शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे, शरद तायडे आदींनी देखील पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.