जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर जखमी होऊन २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता समोर जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैभव अनिल पाटील (वय २२, रा. आव्हाने, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात वैभव पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १९ नोव्हेंबर रोजी वैभव पाटील हा घरी एकटाच असताना त्याच्या अंगावर गरम पाणी पडले होते. त्यानंतर तो घराबाहेर ओरडत आला होता.
दरम्यान त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.