साडेचार लाखात व्यापाऱ्याला गंडवले; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याची ४ लाख २३ हजार ८५० रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदाबाद येथील गुजरात मधील कंपनीच्या मालकाविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमीद युसुफ कच्ची (रा. कासमवाडी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. संशयित आरोप मुकेश मिस्त्री (अंबिका इंजिनिरीअर्स रा. अहमदाबाद, गुजरात) याने १८ जानेवारी २०२२ रोजी आठवले बाजार पुष्पलता बेंडाळे चौक येथे “टोमेटीक लोड सेल बेस फाइव्ह हेड लिक्वीड फिलींग मशीन” हे  हमीद यांच्या कंपनीस देण्यासाठी केलेल्या कराराचा भंग केला आहे.

हमीद यांनी  सदर मशीनसाठी ॲडव्हान्स ३५ टक्के रुपये अर्थात ४ लाख २३ हजार ८५० रुपये अॅक्सीस बँक खात्यातून अंबिका इंजिनीअरींर्सच्या इंडीयन बँक या खात्यात जमा केले होते. परंतू अद्यापही मशीन न मिळाल्यामुळे हामिद कच्ची यांची आर्थिक नुकसान करुन फसवणूक केली आहे.

याप्रकरणी हमीद कच्ची यांनी मंगळवार २ ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मुकेश मिस्त्री विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here