मोठी बातमी.. जळगाव जिल्ह्यात 2 कोटींची रोकड जप्त

पोलिसांच्या कारवाईने खळबळ : चाळीसगाव, कासोदा, भडगाव येथे कारवाई

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून जागोजागी नाकेबंदी करण्यात आली आहे. या तपासणीत 1 कोटी 90 लाख 65 हजार 412 रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून पुढील तपास केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मंगळवारी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील जामडी येथे लावण्यात आलेल्या एसएसटी पॉइंटवर दुपारी नाकाबंदी दरम्यान नागदकडून चाळीसगावकडे जात असलेल्या महिंद्रा वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये 7 लाख 22 हजार 500 रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली आहे.

दुसरी घटना कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आउट स्किम नाकाबंदी करीत असतांना एरंडोलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा ही सांयकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान थांबवून तपासणी केली असता 500 व 100 दराच्या नोटा मिळून आल्यात. पोलिसांनी रक्कम तपासली असता 1 कोटी 45 लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पारोळा चौफुली भडगाव येथे नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करताना 1 लाख 49 हजार रुपये रोख मिळून आली असून सदर रक्कम पुढील कारवाईसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील एफएसटी पथक क्र्रमांक 3 यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील नेरी येथे नाकाबंदी दरम्यान एक इसमाच्या ताब्यातून 4 लाख 46 हजार 120 रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.