धावत्या रेल्वेच्या धक्क्याने २६ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जळगाव शहरातील शाम नगरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे.

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आर्यकिर्ती उर्फ बबलू चंद्रकांत सोनवणे (वय २६ रा. श्याम नगर, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील श्याम नगरात बबलू सोनवणे हा आपल्या वडील व भावांसोबत वास्तव्याला होता. शहरातील विजय कलेक्शन येथे कामाला होता. शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळातच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. यावेळी नातेवाईकांसह मित्र परिवाराने एकच आक्रोश केला होता. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.