जळगाव ;- शहरातील जावळे हॉस्पिटल समोर लावलेल्या वीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने ८ रोजी सायंकाळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गौरव दिनेश चंद्र पाटील रा. ममुराबाद हा शिक्षण घेत असून त्याने 8 सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील जावळे हॉस्पिटल जवळ त्याची वीस हजार रुपये किमतीची प्लेटिना दुचाकी क्रमांक mh19 बी एक्स 38 75 लावली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली . याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे करीत आहे.