Wednesday, August 10, 2022

निमगाव खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

“समाज सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा !” अशी समाजाला शिकवण देणाऱ्या परम पूज्य श्री सत्य साईबाबांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने जळगांव येथील आर. एल. हॉस्पिटल मधील डॉ. सूरज भुतडा आणि जिल्हा न्यायालयातील कार्यरत कर्मचारी श्री. बी. जी.नाईक यांच्या आर्थिक योगदानातून जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावापासून ३ कि. मी. अंतरावरील “निमगाव” या छोट्याशा खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॉटल, लंच बॉक्स या शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे समाज सेवेच्या स्वरूपात मोफत वाटप करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

सदरील कार्यक्रमास डॉ. स्नेहल भुतडा, शाळेचे मुख्याध्यापक किरण इसाने, शिक्षक सुनील पोळ, व्यपस्थापिका सविता धनगर, सरपंच प्रियांका पाटील, अंगणवाडी सेविका मंगला महजान यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील कार्यक्रमास पालकांची आणि गावकऱ्यांची देखील उपस्थिती होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या