जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील बोहरी गल्लीत सोमवारी रात्री पावणे अकरा वाजच्या सुमारास अब्दुल असोसिएट या दुकानाला आग लागून दुकानातील पाईप, प्लास्टिक वस्तू, व इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. दरम्यान दुकान मालक हे दुबई येथे गेले असून अग्निशमन दल व पोलिसांनी दुकानाचे कुलूप तोडून आग नियंत्रणात आणली.
शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या बोहरी गल्लीत तीन भावांचे वेगवेगळे दुकान आहे. यातील अब्दुल असोसिएट या दुकानातून रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास धूर येत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या काही जणांना दिसले. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले. काही वेताळात घटनास्थळी तीन बंब दाखल झाले. त्यांनी बाहेरून पाण्याचा मारा करून आग नित्यानंतरणात आणली. यावेळी पोलीस पथक देखील या ठिकणी पोहोचले. मात्र दुकान मालक हे दुबईला असल्याने दुकान बंद होते.