जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आजादी का अमृत महोत्सव हा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आयोजित केला आहे. आजादी का अमृत महोत्सवाची सांगता दिनांक 9 ऑगस्ट 2023 ते 30 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. महोत्सव अंतर्गत ‘मेरी माती मेरा देश’ ही प्रस्तावित मोहीम स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या वीरांनी त्या केला त्यांच्या आदराकरिता आयोजित केली आहे. सदर मोहिमेचे उद्दिष्ट युवा पिढीमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे अशी आहे.
दरम्यान तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधून माती गोळा करून तालुक्याचे ठिकाणी एकत्रित करून तालुक्यातून एक कलश दिल्ली येथे येणार आहे. असे देशभरातून सुमारे 7500 तालुक्यातून कलश एकत्रित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील नेहरू युवा केंद्र संघटनाच्या जिल्हा युवा अधिकाऱ्यांच्या मार्फत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
‘मेरी माती मेरा देश’ भारताच्या मातीचा आणि शौर्याचा एकत्रित उत्सव स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या राष्ट्राच्या प्रवासाचे स्मरण करते हा कार्यक्रम भूमिशी संबंध जोडून आणि आपल्या विचारांचा सन्मान करून हा कार्यक्रम राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण करेल आणि भावी पिढ्यांना भारताच्या वारसाचे रक्षण करेल
या कार्यक्रमाचे पाच टप्पे आहेत
1- शीला फलकम– पंचायत स्तरावर स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे शीलाफलकम उभारायचे आहे
2- पंचप्राण प्रतिज्ञा व सेल्फी– ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन एक मूठभर माती किंवा मातीचा दिवा दोन पाच प्रतिज्ञा घ्यायची आहे.
3- वसुधा वंदन– स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले याचा प्रतिकार्त 75 रोपे लावण्यात येणार आहे.
4- वीरो को वंदन– स्थानिक परंपरा रितीरिवाज नुसार स्वातंत्र्यसैनिक यांचा सन्मान करणे
5- ध्वजारोहण व राष्ट्रगीत– राष्ट्रध्वज फडकविणे व राष्ट्रगीत गायन करणे