गिरीश महाजनांच्या ‘पीए’ ने लाखोंची पैज जिंकूनही धनादेश केला परत..

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी मंत्री गिरीश महाजनांचा पीए अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल पाटील यांच्यात राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून एक लाख रुपयांची पैज लागली होती.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार जिंकणार म्हणून अरविंद देशमुख यांनी खुले चॅलेंज केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लाखांच्या पैजेचं आव्हान दिलं होतं.

दरम्यान  ही पोस्ट पाहताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांच्याशी फोन वर संपर्क साधून पैजेच आवाहन स्वीकारलं.

मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून आल्याने राहुल पाटील पैज हरले. पैज हरल्यानं राहुल पाटील यांनी एक लाख रुपयांचा धनादेश चेक स्वरूपात अरविंद देशमुख यांना देण्यासाठी जीएम फाउंडेशन या ठिकाणी आले होते. पण अरविंद देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्याला जवळ घेत चांगलेच कौतुक करत सन्मान केला.

‘तर पैसाच नव्हे तर आपल्या नेत्याबद्दलचा असलेला प्रचंड आत्मविश्वास हा कार्यकर्ताचा असावा, हे फार महत्त्वाचे असते’ असे अरविंद देशमुख यांनी सांगितले. सामान्य कुटुंबातील राहुल पाटील यांनी ते आव्हान पूर्ण केला म्हणून महाजनांचे ‘पीए’ अरविंद देशमुख यांनी चेक स्वरूपात असलेला लाख रुपयाचा धनादेश राहुल पाटलांना खिशात घालून परत केला. व पाठीवर कौतुकाची थाप दिली. अन् यांच्यातल्या या पैजेची राज्यभर चांगलीच चर्चा रंगली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here