शहरातील रस्त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे मनपासमोर निदर्शने

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहर महानगरपालिका यांचे हद्दीतील मुख्य रस्ता म्हणजे महात्मा गांधी मार्केट, चौबे मार्केट येथील रस्त्यासह वाल्मिक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, तानाजी मालुसरे नगर व इतर भागासह लेंडी नाल्याजवळून ते श्रीराम चौकापर्यंतच्या त्यांची अवस्था अत्यंत दयनिय व विकट अशी झालेली आहे. परंतु आपल्या महानगरपालिकेचे या संपूर्ण रस्त्यांकडे आज रोजी सोईस्कर पणे दुर्लक्ष केले जात आहे.

सदरील स्त्यांबाबत तेथील लोकांनी अनेक वेळा म.न.पा. प्रशासनाकडे निवेदन व तक्रारी अर्ज देऊन सुध्दा त्याचा काहीएक परिणाम झालेला नाही. बाबतीत  समस्यांची म.न.पा. कडे प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली असता संबंधित अधिकारी उत्तरे देतात की, तुमचा वार्ड हा गावठाण मध्ये येतो व त्यामुळे त्याला तुम्हाला या कुठल्याही योजना लागू होत नाही, अशी उत्तरे देतात. परंतु दर वर्षाला घरपट्टी, नळपट्टी ही वेळेवर वसूल केली जात असते. आमचा भाग जर गावठाण मध्ये येतो तर मग म.न.पा. वसुली का करते? हा मोठा प्रश्न आहे.

तसेच रस्त्यांची अवस्था अत्यंत निंदनीय आहे. दिवसागणिक अनेक लोकांना अपघातांना तोंड द्यावे लागते. रस्ता हा पुढील सहा ते सात गावांना जोडणारा असतो.  त्यामुळे रस्त्यावर मोठी दुर्घटना होऊ शकते. सदरील परिसरात गटारींची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तेथील गटारीचे सुद्धा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात यावा.

महात्मा गांधी मार्केट रस्त्यावरील भाजीपाला फळ विक्रेते यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तेथून पायी जाण्यासाठी सुद्धा रस्ता नसतो. सर्व समस्यांकडे प्रशासनाचे तात्काळ लक्ष देऊन परिसरातील रस्त्यांच्या कामांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ सुरुवात करावी. व अतिक्रमण काढण्यात यावी. असे झाल्यास वाल्मिक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, तानाजी मालुसरे नगर येथील रहिवासी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनपासमोर  निदर्शने करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी, राष्ट्रीय कॉंग्रेस महानगर अध्यक्ष रिंकू चौधरी, माजी नगरसेवक राजू मोरे, किरण राजपूत, सुशील शिंदे, अनिल पटेल, अमोल कोल्हे इत्यादी सह उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.