सेवानिवृत्ती अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे बोंबाबोंब आंदोलन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात सुमारे ४०० अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सेवानिवृत्त होऊन चार वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु त्यांना महाराष्ट्र सरकारने मान्य केलेला सेवा निवृत्ती लाभ एक रकमी लाभ अद्याप मिळालेला नाही. या सेवानिवृत्त सेविका मदतनीस काही वारल्या असून काही 68 व 69 वर्षाच्या वयोवृद्ध झालेल्या आहेत. त्यांना पेन्शन नसल्यामुळे फक्त सेवानिवृतीचा एकरकमी लाभावरच पुढील आयुष्य जगण्याची आशा आहे.

महाराष्ट्र सरकारने त्यांना गेल्या चार वर्षापासून यामुळे एकरकमी लाभ न दिल्याने त्या हलाखीचे जीवन जगत आहेत. महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपये सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना एक रकमी लाभ भारतीय विमा जीवन विमा निगम कार्यालयामार्फत मंजूर केले आहेत. या मंजुरीला एक दीडमहिन्याचा कालावधी लोटून सुद्धा सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना लाभ मिळत नाही.

या बाबतीत विशेष लक्ष घालून लाभ त्वरित मंजूर करून द्यावा. या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी बोंबाबोंब आंदोलन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.