Thursday, August 11, 2022

अंगुली मुद्रा कक्षाचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अंगुली मुद्रा कक्षाचे  जळगाव शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते आज सकाळी उद्घाटन करण्यात आले.

ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम अर्थात (अँबिस) AMBIS या संगणकीय प्रणालीचे उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन डोंगरे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सांगितले की, अँबिस संगणकीय प्रणालीमध्ये आरोपींच्या बोटांची ठसे पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, फोटो, डोळ्यांचे बुबुळे हे सर्व डिजिटल स्वरूपात जतन करून गुन्ह्यात ठसे मॅचिंग करण्याची क्षमता आहे. संगणकीय प्रणाली राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य देशात पहिले ठरले असून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये जवळपास ६ लाख ५०० गुन्हेगार व शिक्षापात्र आरोपींची माहिती संगणिकृत करण्यात आलेले आहे.

अँबिस प्रणाली ही पोलीस विभागात वापरण्यात येणाच्या इतर संगणकीय प्रणालीशी जोडले जाणार आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत यापुर्वी अटक केलेल्या सर्व आरोपींचे सर्व ठशांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्वइतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी बोलताना दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बारी, अशोक महाजन, पोहेकॉ जयंत चौधरी, विनायक पाटील, किशोर मोरे, सचिन चौधरी यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या