भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा जोडे मारो आंदोलन करून निषेध

1

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

खासदार सुप्रिया सुळे यांचे देशाच्या व राज्याच्या राजकारण व समाजकारणात मोठे योगदान आहे. त्यामुळेच भारतीय संसदेने त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल सात वेळेस संसदरत्न पुरस्कार दिलेला आहे. असे असतांना देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटलांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ” घरी भाकरी थापा, स्मशानात जा ” असे बेताल व निंदनीय वक्तव्य केलेले आहे, असे वक्तव्य करून पाटील यांनी सुप्रिया सुळे व समस्त नारीशक्तीचा अपमान केलेला आहे.

याउलट चंद्रकांत पाटील यांचे महाराष्ट्रात काहीच योगदान नाही, म्हणूनच स्वतःच्या कोल्हापूर मतदारसंघात निवडणूक येण्याची देखील त्यांची लायकी नाही. एका महिलेला डावलून राजकिय अन्याय करत कोथरूड मतदार संघात महिलेला डावलून चंद्रकांत पाटिल निवडणून आलेले आहेत. तरीही त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्द्दल असे वक्तव्य करणे अत्यंत गैर व खेदजनक आहे.

सदर वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी आमदार मनीष जैन, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटिल, अरविंद मानकरी, रिकू चौधरी, सुशील शिंदे, अमोल कोल्हे, राजू मोरे, किरण राजपूत, अकिल पटेल, रहीम तडवी, मजहर पठाण, आशा अंभोरे, जयश्री पाटिल, विमल मोरे, अर्चना शिंदे, अशोक सोनवणे, रमेश बाहरे, नईम खाटिक, राहुल टोके, किरण चव्हाण, जितेंद्र बागरे, राजा मिर्झा आदि कार्यकर्ते सहभागी झाले.

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    यांनी बोलायच्या सर्व हद्दी पार केल्या आहेत . यांच्यावर गुन्हे दाखल करून शिक्षा दिली पाहीजे . यांची निवडणूक लढवण्याची लायकी नाही . स्वतःच्या मतदार संघात प्राबल्य नाही . वशिल्याने अध्यक्ष झाले म्हणून काहीही बोलू नये .

Leave A Reply

Your email address will not be published.