तापी नदीतून वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टर पकडले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील डिकसाई शिवारातील तापी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झालाय.

तालुक्यातील डिकसाई शिवारात असलेल्या तापी नदीपात्रातून काहीजण वाळूची चोरी वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांना मिळाली. या माहितीनुसार त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. यावेळी पोलीस कर्मचाऱ्‍यांनी बुधवार २५ मे रोजी दुपारी १२ वाजता डिकसाई शिवारातील तापी नदीपात्रात गेले असता वाळूने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ३९८६) आढळून आले.

ट्रॅक्टर चालक मुकूंदा सुक्राम साळुंखे रा. कोळन्हावी ता. यावल याला वाळू वाहतूकीचा परवानाची विचारपूस केली असता ट्रॅक्टर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दिपक कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.