वास्तु आरोग्यमचे संस्थापक डॉ. अविनाश कुळकर्णीजिवन गौरव पुरस्काराने मुंबईत सन्मानीत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील सुप्रसिद्ध वास्तु आरोग्यमचे संस्थापक डॉ. अविनाश कुळकर्णी यांचा जिवन गौरव पुरस्काराने (Jeevan Gaurav Award) सन्मान तर वास्तु आरोग्यम् च्या कार्यकारी संचालक सौ. आकांक्षा निखील कुलकर्णी यांचा वास्तु एज्युकेशनिस्ट या पुरस्काराने रशियन सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड कल्चर फेडर रोड, मुंबई येथे नुकताच सन्मान करण्यात आला. जळगाव येथील सुप्रसिद्ध वास्तुऊर्जा तज्ञ, मास्टर डाऊजर, एनर्जी एक्सपर्ट डॉ.अविनाश कुळकर्णी यांचा नुकताच ऑल इंडीया बेहराम बाग सोसायटी आणि झोराष्ट्रीयन कॉलेज तर्फे ३७व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ मेडिसीना अल्टरनेटिव्हा सायन्स अ‍ॅण्ड स्पिरिच्युअ‍ॅलिटी तर्फे जिवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. कुळकर्णी यांनी वास्तुशास्त्र व वास्तुऊर्जाशास्त्र यात केलेल्या संशोधनासाठी जिवनभर स्वत:ला वाहून घेतले आहे.

वास्तु आरोग्यम् ही संस्था जगभरात वास्तुशास्त्रावरील भारतीय प्राचीन शिक्षण, वास्तू व ऊर्जा परिक्षण, जमिनीखालील पाण्याचा शोध, जिओपॅथीक स्ट्रेस यासह वास्तुशास्त्रातील अनेक कामांसाठी प्रसिद्ध आहे. संस्थेच्या भारताबाहेर ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सिंगापूर, यु.एस.ए., इटली, दुबई, रशीया येथे शाखा असून भारतात सुमारे ४५ हून अधिक शाखा आहेत. नुकतेच डॉ. कुळकर्णी यांनी आरोग्यम् इन्स्टिीट्युट ऑफ एन्शीयन्ट नॉलेज सुरू केले असून त्यात वास्तुशास्त्राचे भारतीय प्राचीन ज्ञान शिकवले जात असून अनेक डिप्लोमा कोर्सेस यात समाविष्ट आहेत. या सर्व कामांची दखल घेत झोराष्ट्रीयन कॉलेजच्या मेहेर मास्टर मुस व त्यांच्या चमुने रशियन हॉल मुंबई येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

तसेच वास्तुआरोग्यमच्या कार्यकारी संचालक सौ.आकांक्षा कुळकर्णी यांना वास्तु एज्युकेशनिस्ट अवार्ड त्यांनी केलेले वास्तुशास्त्राच्या कार्याबद्दल प्रदान करण्यात आले. त्या ऊच्च शिक्षीत असून देखील भारतीय प्राचीन शास्त्राबद्दलच्या आवडी मुळे आकांक्षा ह्या त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वास्तुशास्त्रात अनेक कामे करीत आहेत. त्या स्वत: ऊर्जा शास्त्रात पी.एच.डी. करीत असून त्या वास्तु विशारद, मास्टर डाऊजर, वास्तु कन्सल्टंट, अंकशास्त्र पंडीत आहेत.

डॉ. अविनाश कुळकर्णी हे वास्तु आरोग्यम् द्वारे जिओपॅथीक स्ट्रेट डिटेक्शन व ट्रिटमेंट, वास्तु शास्त्र कन्ल्टन्सी, रेसीडेन्शीयल व कमर्शियल बिल्डींगचे वास्तुशास्त्रानुसार प्लॅनींग, वास्तुदोष निवारण, पाण्याचे स्त्रोत शोधून देणे, वास्तु शास्त्र शिकवणे यासह अनेक वास्तुशास्त्राशी संबंधीत कामे करीत असतात. डॉ. कुळकर्णी यांचे भारतासह भारताबाहेर सुमारे ९००० विद्यार्थी आजही कार्यरत आहेत व वास्तुशास्त्राच्या माध्यमातून उत्तम अर्थार्जन करीत आहेत. वास्तु आरोग्यम् वास्तु दोष निवारण करून लोकांच्या जिवनात हास्य आणि आनंद फुलवत आहे.

डॉ. कुळकर्णी व त्यांच्या कन्या आकांक्षा कुळकर्णी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सॅटर्डे क्लब जळगाव रिजन, डॉ. राहुल मयूर, योग प्रबोधिनी संस्था जळगाव, अ‍ॅड. निखील कुळकर्णी, एसएसडी चे संचालक दिनेश थोरात, गणेश नाईक, आर्कि. नितीन पारगावकर, वापी येथील आर्कि़ धिरज पाटील, वास्तु आरोग्यम् परिवार यांच्यासह अनेक संस्था व मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.