रायसोनी इस्टीट्युट मध्ये गुणगौरव सोहळा पार पडला; प्रितमजी रायसोनी यांची प्रमुख उपस्थिती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सावखेडा‎ येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक आंतरशालेय विविध स्पर्धेत विजयी‎ झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना मेडल, सन्मानचिन्ह व‎ प्रमाणपत्र देऊन सन्मानित‎ करण्यात आले. सांघिक‎ खेळातील विजयी संघाना ‘अॅचिव्हर्स चषक’ व प्रमाणपत्र देऊन‎ सन्मानित करण्यात आले.‎ यावेळी रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितमजी रायसोनी, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका राजुल रायसोनी, नेत्ररोगतज्ञ डॉ. रेणुका चव्हाण, जी. एच. रायसोनी कनिष्ट विद्यालयाच्या प्राचार्या प्रा सोनल तिवारी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या उपस्थित गुणगौरव सोहळा पार पडला.‎ जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील‎ विद्यार्थी भविष्यामध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्याचे‎ आणि भारत देशाचे नाव उज्वल करतील असा‎ विश्वास संचालक प्रितमजी रायसोनी यांनी बोलताना व्यक्त केला.‎ सूत्रसंचलन शिक्षिका अल्फिया लेहरी व अश्विनी गोगले तर‎ आभार प्रदर्शन लीना त्रिपाठी यांनी केले. कार्यक्रम‎ यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व‎ शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.‎

विविध स्पर्धेतील विजेते

सायन्स क़्विज– कीर्तन अग्रवाल, श्रेयांश महाजन, अद्वैत पाटील, स्नजम छाबडा, अनया पलोड आणि सिद्धांत काबरा,

फॅन्सी ड्रेस स्पर्धा– श्राव्या मुठा, मनस्वी शिरसाठ, अर्णा पाटील, निकेत खडके,बटूल मास्टर, विराट साहित्य, वीरांश सुराणा, अबिज्वल पात्रा,

संस्कृत क़्विज– विहान मुथा, धैर्य लोढा, महर्षी जोशी, पार्थ नारखेडे, अनया पालोद आणि नामी रंका,

कोडेथाॅन स्पर्धा– गौरी पाटील, कौस्तुभ साळुंके, आद्य मोहपात्रा, मनस्वी शिरसाठ, समायरा बाविस्कर, महेक ललवाणी, भाविक जैन, सुकृत पाटील, युग तलरेजा, मितांश मुंदडा आणि वीरांश सुराणा, रुत्विक अग्रवाल, धैर्य लोढा आणि उदय बोरसे, आयुष वंजारी, रोनक भल्ला, समानु जैन, रोनक महाजन, अबीर ठाकूर, सोहम अडवाणी, भक्ती खडके कृतांश सुराणा, हिमांशू रंगलानी, विहान मुथा, आरुष चौधरी, लव हसवानी, कार्तिक हिरे, अनया आहुजा, संजमकौर छाबडा, गीत जैन, आर्ष पटनी, अनया पालोद, लब्धी पांगरिया, हृतुजा भंडारी, श्रावस्ती कोचुरे आणि पार्थ नारखेडे, आशिता रायसोनी, सौम्या काब्रा, इद्रिस चष्मेवाला,

विज्ञान प्रदर्शन स्पर्धा – हृतुजा भंडारी, शारावस्ती कोचुरे, कनक सोनवणे, देवश्री चंद्रवंशी, श्रुस्ती काबरा, सौम्या काबरा, संजम छाबडा, अनया आहुजा, विहान मुथा, कलश मुंदडा, नीरव जैन, गार्गी तेली, राधिका चौहान, विधी रायसोनी, शुभी बुद्धदेव,जैनील गाला,

जी के प्रश्नमंजुषा स्पर्धा– संस्कृती पाटील,वीरा शर्मा,जियांश शमनई,मौतीका रायाला, सान्वी रंगलानी,कार्तिक पाटील, कबीर मंत्री, अरहम शाह,अवयान जैन,वर्णित लुणावत,शिवांश आहुजा,

पठण स्पर्धा– दिव्यांश जांगीड,प्रार्थना जैन,मुक्‍तीका रायाला, पार्थ चरखा,आयात शहा, आश्वी अग्रवाल,हुसैना खान,जैनम गडीया,अर्णव जैन,शिवम नागदेव, अरहम शहा,अवयान जैन,मेहक जैन, स्तुती मणियार, सोहम बडगुजर

Leave A Reply

Your email address will not be published.