Monday, August 15, 2022

आम आदमी पार्टीतर्फे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिराचे शुभारंभ करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या शिबिराप्रसंगी नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील कोठारी, दंततज्ञ डॉ. अनुजा पाटील, ऍड. प्रतिभा पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

यावेळी जळगाव शहर महानगर कार्याअध्यक्ष योगेश हिवरकर यांनी मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत गरजा मानल्या जातात, त्याचप्रमाणे प्रत्येक मानवाचे आरोग्य देखील खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य उत्तम तर मानव जीवन सुखी असे मनोगतात व्यक्त करण्यात आले.

यावेळी आशा गट प्रवर्तक शारदा लुटे, बबिता बाविस्कर, छाया बिरारी, योगिता कोळी, प्रतिभा काळे, मृणाल पाटील, वैशाली बारी, जोशना शिंदे, आरोग्य अधिकारी समवेत गणेश राणे, समाधान चौधरी, गोपाळ माळी यांनी रुग्णाची तपासणी केली.

यावेळी जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई, जळगाव शहरमहानगर कार्याध्यक्ष अनिल वाघ सर, जळगाव महानगर सचिव चंदन पाटील, सदस्य हेमंत सोनवणे, पवन खबायत, हेमराज सोनवणे, भुपेद्र ठाकरे, विक्रम कापडणे, दुर्गेश निंबाळकर (मधुमेह डायबिटीस मुक्त भारत अभियान समन्वयक – स्वास्थ्य प्रचारक), तुषार तायडे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिबिरात शेकडो रिक्षा चालक मालकांनी आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आप पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. हेमंत सोनवणे यांनी आभार व्यक्त करून शिबिराचा समारोप केला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या