जळगावात २ व ३ एप्रिल रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन २ व ३ एप्रिल रोजी जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी १३ मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी म्हटले की, बौद्ध साहित्य प्रसार संस्था संचलित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्रच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन हे जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे २ व ३ एप्रिल रोजी होत आहे. या साहित्य संमेलनामध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर हे अध्यक्षपदी राहणार असून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी २ एप्रिल रोजी संविधान सन्मान रॅली शहरातून काढण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी धम्म जागृती रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या संविधान सन्मान रॅली व धम्म जागृती रॅलीसाठी जळगाव जिल्ह्यातील १० गावांची निवड करण्यात आलेली आहे. शिवाय संचलन व मानवंदना समता सैनिक दल व महार रेजिमेंट मार्फत दिली जाणार असल्याचे बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुकुंद शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष भरत शिरसाट, कार्यवाह समितीचे अध्यक्ष अशोक बैसाने यांच्यासह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here