रेल्वे ट्रॅकवर आडवा झाला ट्रक : मोठी दुर्घटना टळली

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबईहुन नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला आहे. मुंबई लाईनवर सरवाडी या रेल्वे स्थानकाजवळच एका ट्रक चालकाने रेल्वे ट्रॅकवर ट्रक आडवा घातला. यामुळे पटरीवरून हा ट्रक निघू शकत नव्हता. याच दरम्यान जालन्याहून नांदेडच्या दिशेने जाणारी तपोवन एक्सप्रेस येत असताना लोको पायलटने प्रसंगावधान राखत रेल्वे रोखल्याने होणारा मोठा अपघात टळला आहे.

दरम्यान दहा- बारा दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ एका अफवेमुळे रेल्वेतून खाली उतरलेल्या प्रवाशांना वेगाने आलेल्या एक्सप्रेसने उडविल्याची घटना घडली आहे. यानंतर जालना जिल्ह्यात रेल्वेचा मोठा अपघात होता होता वाचला आहे. यात तपोवन एक्स्प्रेस जालन्याहुन नांदेडकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. एक्सप्रेस जात असताना जालना तालुक्यातील सारवाडी स्थानकाजवळ एका ट्रक चालकाने ट्रक थेट रेल्वे पटरीवर चढवला होता. यामुळे ट्रक निघणे कठीण झाले होते. याच वेळी वेगाने येणारी एक्सप्रेस आणि ट्रक यांच्यात काही अंतर बाकी असतानाच अचानक रेल्वे लोको पायलटने रेल्वे थांबवल्याने हा रेल्वे आणि ट्रकचा समोरा-समोर होणारा अपघात टळला.

जालना स्थानकाडावरून तपोवर एक्सप्रेस सुटल्यानंतर रेल्वेने वेग धरला होता. याच वेळी समोर रेल्वे पटरीवर ट्रक आडवा असल्याचे पोलो पायलटच्या लक्षात आले. यामुळे रेल्वे चालकाने घटनेचे प्रसंगावधान राखून रेल्वे थांबविली. यानंतर रेल्वेतील प्रवासी खाली उतरले आणि प्रवाशांनीच ट्रकला धक्का मारत रेल्वे पटरीखाली नेला. यानंतर रेल्वे नांदेडकडे रवाना झाली. सुदैवाने यामध्ये मोठा अनर्थ टळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.