जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला कट मारल्याचे दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या रूमारास रेमंड चौफुकू परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील मकरंद कॉलोनीत हर्षल शिरीष भंडारी (वय ३९) हे वास्तव्यास आहे. ते त्यांचा मित्र संजय नामदेव साठे यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्गावर रेमंड चौफुलीजवळून (एमएच १२, एफएच ४४४९) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच २८, बीडब्ल्यू ०२७३ ) कारने भंडारी यांच्या दुचाकीला कट मारला. त्यात उचकी खाली पडली व त्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी हर्षल भंडारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.