Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण
    कृषी

    जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 11, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते जैन हिल्स येथील केळीच्या बनात करण्यात आले. या सोहळ्याला जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा वारसा भक्कमपणे पुढे नेणाऱ्या जैन परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. तसेच जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि सहकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    नव्याने विकसीत केलेल्या जाती ‘जैन मॅडरिन-१’ ही जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले एक आधुनिक आणि उत्पन्नक्षम संत्र्याचे नवीन वाण आहे. पारंपरिक संत्र्याच्या तुलनेत ही जात लवकर फळधारणा होत असलेली आहे. या वाणामुळे कमी कालावधीत बाजारात येणारा दर्जेदार माल मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची संधी वाढते. विशेष म्हणजे दुसऱ्याच वर्षापासून झाडांना फळधारणा सुरू होते, त्यामुळे संत्रा बाग गुंतवणुकीवर लवकर परतावा मिळतो.

    या संत्र्याची चव ही नागपूर संत्र्यापेक्षा अधिक गोड असून फळांचा रंग आकर्षक, गडद आणि लालसर केशरी असतो. फळांचा आकार, सोलण्याची सुलभता आणि रसाळपणा यामुळे ‘जैन मॅडरिन-१’ हा टेबल पर्पज म्हणजेच थेट खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असे दर्जेदार फळ मिळत असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेसोबतच निर्यातीसाठीही ही जात आशादायक ठरू शकते असा विश्वास कंपनीचे लिंबू वर्गिय फळांचे संशोधक डॉ. मिलींद लदानिया यांनी सांगितले.

    उत्पादनाच्या दृष्टीने ही जात भरघोस उत्पादन देणारी आहे. या जातीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलधारणा करण्यासाठी पाण्याचा ताण देण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे पाणी व्यवस्थापन अत्यंत सुलभ होते. कमी पाण्यातही स्थिर उत्पादन देणारी ‘जैन मॅडरिन-१’ ही जात बदलत्या हवामानात आणि मर्यादित संसाधनांमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.

    Agriculturalist Ashok Jain Jain Irrigation Jain Madrin-1 Release Research scientist Varieties
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

    April 10, 2026

    जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!

    April 10, 2026

    नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.