Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन
    कृषी

    जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 30, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योगाची चालना मिळावी या मुख्य उद्देशाने गत ७ वर्षांपासून जैन हिल्स येथे संम्मेलन भरविण्यात येत आहे. गुजरात व महाराष्ट्रातील राज्यातील १३५ शाळांतील ११ हजार विद्यार्थ्यांमधून ८०० विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या ८ व्या संम्मेलनाचे आयोजन १ ते ५ जून दरम्यान जैन हिल्स येथे करण्यात आलेले आहे.

    १ व २ तसेच ४ व ५ जून अशा दोन टप्प्यात हे संम्मेलन होईल. शाळाशाळांमधून फालीच्या माध्यमातून सुमारे २५ हजार हून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेले आहे. नादीर गोदरेज (अध्यक्ष फाली व गोदरेज ग्रुप), रजनिकांत श्रॉफ अध्यक्ष यूपीएल, अनिल जैन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन, नॅन्सी बेरी – उपाध्यक्ष असोसिएशन फॉर फाली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या संम्मेलनाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक कृषी उद्योजक यशस्वी झालेले आहेत हे या संम्मेलनाचे फलीत म्हणता येईल. अशा ६ यशस्वींचे अनुभव कथन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.

    शालेय विद्यार्थ्यांसाठी फालीमुळे शेतीकडे उत्तम करियर म्हणून तसेच ते  उदरनिर्वाहाचे सुयोग्य साधन आहे अशी दृष्टी विद्यार्थी व पालकांमध्ये आलेली आहे. फालीत सहभागी विद्यार्थी आपल्या शेतकरी पालकाला त्याला मिळालेल्या शेतीविषयक ज्ञानाचा त्याच्या शेतीसाठी उपयोग करू लागला आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीपद्धती त्यांच्या कौटुंबिक शेतीत वापरायला सुरवात केल्यामुळे उत्पादनात वाढ झाली व पर्यायाने कौटुंबीक आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. फालीमुळे कृषिव्यवसायाचा समृद्ध मार्ग गवसला आहे. फालीच्या आठव्या संम्मेलनास गोदरेज अॅग्रोव्हेट, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, युपीएल, स्टार अॅग्री आणि ओमनीव्होर या कृषी क्षेत्रातल्या अत्यंत नावाजलेल्या कंपन्यांचे सौजन्य लाभलेले आहे.

    Future agriculture leaders of India Jain Hills Jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif