Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»राम मंदिर ट्रस्टच्या सचिवपदी आता जगदीश आफळे
    राष्ट्रीय

    राम मंदिर ट्रस्टच्या सचिवपदी आता जगदीश आफळे

    लवकरच होणार सीईओ आणि प्रवक्त्याची नियुक्ती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 29, 2026No Comments100 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अयोध्या येथील राम मंदिरात दान चोरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने आपला नवीन सचिव निवडला आहे. पेशाने अभियंता आणि मंदिर बांधकामात प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या जगदीश आफले यांना पहिले सचिव म्हणून नेमण्यात आले आहे. सीईओच्या नियुक्तीत विलंब होत असल्याने ट्रस्टने सचिव हे नवीन पद निर्माण केले आणि आफले यांना ही जबाबदारी सोपवली. मात्र त्यांच्या नियुक्तीवर औपचारिक शिक्का २ सप्टेंबरला मारण्यात येईल. कारण तेव्हा ट्रस्टची पुढील बैठक होणार आहे. जगदीश आफळेंचे महाराष्ट्राशी असलेल्या कनेक्शनमुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

    श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने जगदीश आफले यांना ट्रस्टचे नवीन अधिकृत स्वाक्षरीकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव स्टेट बँक ऑफ इंडिया कडेही पाठवण्यात आला आहे. दान चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हा मोठा राजकीय मुद्दा बनला होता आणि दीर्घ काळाच्या चर्चेंनंतर महासचिव चंपत राय आणि ट्रस्टी डॉ. अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला होता.

    त्यानंतर ६ जुलैला ट्रस्टच्या बैठकीत तत्कालीन महासचिव चंपत आणि ट्रस्टी अनिल यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यासोबतच ट्रस्टने अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांमध्येही बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ट्रस्टने अंतरिम महासचिव कृष्ण मोहन आणि जगदीश आफले यांची नावे बँकेला पाठवली, मात्र आफले ट्रस्टी नसल्यामुळे बँकेने प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खाते संचालन अडथळ्यात सापडले होते.

    पण नवीन नियुक्तीनंतर ट्रस्टतील स्वाक्षरीकर्त्याबाबतचा अडथळा आता संपला आहे. एसबीआयनेही नवीन प्रस्ताव आल्यानंतर खात्यांचे संचालन पुन्हा सुरू केले आहे. अधिकृत स्वाक्षरीकर्ता नसल्यामुळे ट्रस्टशी संबंधित सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि एजन्सींच्या पेमेंटवर परिणाम होत होता.

    राम मंदिर बांधकामाचे प्रकल्प व्यवस्थापक राहिलेले जगदीश आफले बिना पगाराचे आपली जबाबदारी पार पाडत होते. त्यांना ट्रस्टचे पहिले सचिव बनवण्यात आले आहे. सचिवासोबतच ट्रस्टच्या प्रवक्त्याबाबत निवड प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अनेक नावांवर चर्चा झाली आहे. लवकरच त्याबाबतही नाव जाहीर केले जाईल, असे मानले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोणत्याही परिस्थिती हा कायदा लागू केला जाणार नाही!

    September 15, 2026

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif