Sunday, November 27, 2022

लहानपणापासून संस्काराची रुजवण आवश्यक : मंगला चौधरी

- Advertisement -

लोकशाही जागर संस्कृतीचा 

- Advertisement -

आपल्याकडे असलेली सांस्कृतिकता ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच या संस्कारांची रुजवण गरजेची आहे. यामुळे त्यांच्यामध्ये धार्मिकते सोबत संस्कारांचीही जडणघडण होईल, असे प्रतिपादन नगरसेविका तथा महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती मंगला चौधरी यांनी लोकशाहीच्या कार्यालयात केले.

- Advertisement -

- Advertisement -

दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात नवरात्रीनिमित्त जागर संस्कृतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संस्कृती संदर्भात समाजातील प्रतिष्ठित महिलांकडून विचार जाणून घेतले जातात. काल दिनांक 4 ऑक्टोबर रोजी शहरातील वार्ड क्रमांक सहाच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मंगला चौधरी उपस्थित होत्या.

यावेळी त्यांनी सांगितले की, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन देवीकडे बघण्यासारखाच असावा. आपण आपल्या जुन्या परंपरांना सोडून चालणार नाही. त्यांची रुजवण होणे त्या वाढणे अधिक गरजेचे आहे. अलीकडे त्यांना आधुनिक रूप प्राप्त झाले असले तरी त्यांना सोडून चालणार नाही. राजकीय क्षेत्रात काम करत असताना एक महिला नगरसेवक म्हणून महिलांच्या समस्या अधिक प्रमाणात जाणून घेता येतात. अलीकडे महिला आधुनिक झाल्या असल्या तरी बऱ्याच प्रमाणात काही क्षेत्रांमध्ये त्या अजूनही कमी लेखल्या जातात. मात्र महिलांनी जागृत होणे गरजेचे आहे. महिलांनी फक्त आपण महिला आहोत याबाबत हीन भावना न ठेवता त्या पुरुषांप्रमाणेच प्रगती करू शकतात, हे देखील लक्षात ठेवावे, असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, नगरसेविका पदाचा समाजासाठी वापर होतो ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. अलीकडे राजकारणातही महिला मोठ्या हिमतीने कार्यरत असून प्रगतीपथावर आहेत. हा एक प्रकारे महिलांचा विजय म्हणता येईल. महिलांना मी एवढेच सांगू इच्छिते की, जुनेपणाला मागे टाकून नव्याने पुढे जात रहा. हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या पाल्यासमोरच मोबाईल हाताळला तर त्यांच्यामध्ये तसेच संस्कार रुजवले जातील. त्यांना धार्मिकतेची, संस्कारांची आवड निर्माण व्हावी यासाठी आईची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून आईने अर्थात स्त्रीने याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. वास्तविक ही काळाची गरज आहे.

जे लोक देव मानत नाहीत त्यांना मी आवर्जून सांगेल की, तुम्ही या गोष्टीला नाकारू नका. कारण आपल्या आयुष्यात कोणता ना कोणता प्रसंग आलेला असतो ज्यातून आपल्याला परमेश्वराचे दर्शन होत असते. सण उत्सव हे आपल्याला संयम शिकवत असतात. मात्र यामध्ये भक्ती फार महत्त्वाचे असते. यासाठी लहानपणापासूनच आपल्या मुलांना संस्कारांची आणि संस्कृतीची ओळख करून द्यावी. असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या