जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन ‘जागर’ चे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे.
यानिमित्ताने महाविद्यालयात प्रा. डॉ. योगेश महाजन क्रिडा समन्वयक यांनी स्पोर्ट्स सप्ताह साजरा केला यात प्रामुख्याने बुद्धिबळ, कॅरम, संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्यात तसेच महाविद्यालयाच्या महिला मंच समन्वयक डॉ. सुनिता चौधरी यांनी महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण या विषयावर रांगोळी, मेहंदी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा संपन्न झाली.
आज महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून भारतातील विविध राज्यातील पारंपारिक वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केले आणि त्यावर आधारित नृत्य व कला सादर केल्यात सर्वधर्मसमभाव हा संदेश देण्यात आला.
उद्या दिवसभरात फॅन्सी ड्रेस, प्रश्नमंजुषा, एक मिनिट शो, स्वरचित कविता मिमिक्री विडंबनात्मक काव्य, एकपात्री, एकांकिका दिनांक ९ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक कृत्य, कपल नृत्य, गीत गायन समुहनृत्य, आणि पारितोषिक वितरण सोहळा असणार आहे.
या दोन दिवशीय जागर वार्षिक स्नेहसंमेलनास उद्घाटन कार्यक्रमाला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. कमलेश भावसार, कामगार अधिकारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगांव हे आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, सचिव धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी जळगाव, परितोषिक वितरण शुभहस्ते मा. प्रा. सुरेखा पालवे व्यवस्थापन परिषद सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे सेक्रेटरी एज्युकेशन सोसायटीचे कला व विज्ञान महाविद्यालय भालोद, विशेष अतिथी सुनील पाटील उपाध्यक्ष धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी जळगाव तथा जिल्हा मुद्रांक अधिकारी श्री चंदन अत्तरदे संचालक डॉ. विनय पाटील संचालक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जागर वार्षिक स्नेहसंमेलनाचे सह समन्वयक म्हणून डॉ कल्पना भारंबे हे काम पाहात आहेत.