Saturday, October 1, 2022

जॅकलीनला ED चा दणका ! तब्बल ‘इतक्या’ कोटीची मालमत्ता जप्त

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन ईडीच्या रडारवर आली असून ईडीने मोठी कारवाई केली आहे. २०० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरला जॅकलीन डेट करत असल्याने चांगलीच चर्चेत आली होती. तसेच त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

- Advertisement -

- Advertisement -

ईडीने जॅकलीनवर मोठी कारवाई करत ७. २७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला ५.७१ कोटींची महागड्या भेटवस्तू दिल्याचा अंदाजही इडीने व्यक्त केला आहे, त्यामुळे जॅकलीनच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सध्या या बातमीची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यात जवळचे संबंध असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी चांगलीच रंगली होती. सुकेशने जॅकलीनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तूही दिल्या होत्या. यामध्ये सोन्याचे दागिने, हिरे आणि लाखो रुपयांचा घोडाही त्याने दिला होता. त्यांचे एकत्रित असतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळेच इडीने जॅकलीनवर ही कारवाई केली आहे. याबाबत इडीने जॅकलीनवर सुकेशने तब्बल १० कोटी रुपये उधळल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे.

सुकेश चंद्रशेखर हा मनी लॉड्रिंग प्रकरणात अटकेत आहे. यासाठी जॅकलीन मुख्य साक्षीदार असल्याचे इडीने म्हटले आहे. बंगळूरचा रहिवासी असलेल्या सुकेशने ऐशारामी आयुष्य जगण्यासाठी लोकांना फसवण्याचा धंदा सुरु केला होता. त्याच्यावर फसवणुकीचे तीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र आता या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर इडीने कारवाई केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. जॅकलीन फर्नांडिसही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने सिने जगतातील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या