जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव (का.प्र] येथील काशीबाई उखाजी कोल्हे विदयालयात शिक्षकेवर कर्मचारी जनार्दन गिरधर बाविस्कर आपल्या २८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमात त्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन संस्थेच्या व विदयालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे उपमुख्याध्यापक श्री.एच.जी.काळे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे चिटणीस अवधूत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी अ.प्र.ठाकूर, यु.जी.पाटील, एस.डी. खडके, यांनी सत्कारार्थीच्या सेवाकाळातील योगदाना विषयी मनोगत व्यक्त केले. एच.जी.काळे यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांच्या कार्याचा गुणगौरव करताना यशस्वी जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन बी.बी.देवरे यांनी केले.
कार्यक्रमास पर्यवेक्षक एस.डी. खडके, शिक्षिका एस.राणे, कार्यालयाचे मुख्य लिपीक कोमल डहाके व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.