शेवाळे येथील २५ वर्षाच्या इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

0

लोकशाही न्युज नेटवर्क, पाचोरा | पाचोरा तालुक्यातील शेवाळे (वाडी) येथील २५ वर्षाच्या इसमाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सदरची घटना दि. १७ रोजी मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. शेवाळे येतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन सदरचा गुन्हा पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये शुन्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील प्रविण सुरेश निकम हे त्यांचे डोंगरगाव शिवारात बाजरी काढण्याचे काम सुरू असतांना प्रविण निकम हे विहिरीजवळ गेले असता त्यांना अचानक विषारी सापाने चावा घेतला व ते बेशुद्ध अवस्थेत पडून राहिले. आपला भाऊ खुप वेळापासून घरी न आल्याने त्यांचा भाऊ एकनाथ निकम हे त्याचा शोध घेण्यासाठी विहिरी जवळ गेले असता त्यांना प्रविण आढळून आल्याने त्यांनी उपचारासाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताचे डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. मयताचे पाच्छात आई, एक भाऊ, पत्नी एक मुलगी असा परिवार आहे. प्रविण निकम यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.