Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»अर्थमंत्री दहावी पास आहेत? 9 लाख आपण…
    राजकारण

    अर्थमंत्री दहावी पास आहेत? 9 लाख आपण…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकताच राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर भाष्य केले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. अंजली दमानिया यांनी म्हटले की, 12 ऑक्टोबरला आरटीआय कायदा आपल्या देशात आला. आरटीआय कायद्याला फारसे कोणी महत्व देत नाहीत. खरी लोकशाही हवी असेल तर माहितीचा अधिकार सगळ्यांना हवा. हा कायदा पूर्ववत करण्यात आला पाहिजे. यासोबतच त्यांनी गुंड निलेश घायवळ प्रकरणावर भाष्य करत म्हटले की, सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे? राजकारणात सगळ्यांना गुंड लागतात. राजकारणाचे चित्र बदलाची गरज आहे, त्यांना भीती निर्माण करून राज्य करायचं आहे.

    पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की, पुणे पोलीस आयुक्त यांनी शस्त्र परवाना रद्द केला असताना सुद्धा गृहराज्यमंत्री आदेश देतात, हे रोजचे तमाशे आहेत. संग्राम जगताप यांच्या विधानावर बोलताना दमानिया यांनी म्हटले की, धर्माचा आधार घेत लोकं वक्तव्य करतात. महाराष्ट्राची परिस्थिती बिहार होत चालली आहे, भ्रष्टाचार सगळीकडे आहे. राजकारण मध्ये काय चाललं आहे कळत नाही. घायवळ प्रकरणात मुख्यमंत्री म्हणतात पासपोर्ट आम्ही दिला नाही.

    गलिच्छ पद्धतीने होत आहेत सगळ्या गोष्टी. महाराष्ट्राचे पोलीस खरंच काही काम करत आहेत का? हा प्रश्न उपस्थित होतो. वरून फोन आले की, पोलीस काम करतात. ईडी तर फोन केल्याशिवाय काम करत नाहीत. चौकशी लागल्याशिवाय कुठला ही अहवाल येत नाही. जैन मुनींनी केलेल्या विधानावर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, कबुतरांकडून होणारे अनेक आजार आहेत.

    जैन धर्माच्या डॉक्टर यांना विनंती केली होती की चुकीचं होतं आहे. पुढे दमानिया यांनी म्हटले, अर्थमंत्री दहावी पास आहेत? 9 लाख आपण आणणार कुठून? महाराष्ट्राच्या अर्थमंत्री यांच्याबद्दल मी बोलते आहे मला शिक्षणाची टीका करायची नाही पण त्यांना अर्थकारण कळतं का? राजकारणी यांच्याकडे राजकारण आणि नेते फोडण्यासाठी पैसे आहेत. रोहित पवारांनी दाखवलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री घायवळचे नाव घेतात. आत्ताच्या घडीला तो फरार आहे हे फार वेदनादायी आहे. मुख्यमंत्री अशा लोकांना पाठिंबा देत असतील तर हे चुकीचं आहे, असे त्यांनी म्हटले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड

    November 6, 2026

    अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif