Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»देशात ‘ऑपरेशन टायगर’च्या आडून ‘ऑपरेशन देवेंद्र’?
    राजकारण

    देशात ‘ऑपरेशन टायगर’च्या आडून ‘ऑपरेशन देवेंद्र’?

    फडणवीसांना पंतप्रधान होऊ द्यायचं नसेल, म्हणून हे राजकारण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 28, 2026No Comments370 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ठाकरे बंडखोरांचा समाचार घेत आहे. देशात ‘ऑपरेशन टायगर’च्या आडून वेगळंच राजकारण शिजत असल्याचा दावाही उद्धव ठाकरेंनी केलाय. देशात ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरु असून एका गटाला त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही, अशी राजकीय खेळी सुरू असल्याचा दावाच उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाकरेंच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    उद्धव ठाकरे हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, ‘आमच्या पक्षात अंतर्गत गटबाजी नाही. तशी तर सर्व पक्षात दिसते. त्यांनी फोडाफोडीला ‘ऑपरेशन टायगर’ नाव दिलं. पण हे ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे का? ही त्यांच्यातील अंतर्गत गटबाजी आहे. देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत येऊ द्यायचं नसेल. त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नसेल, त्यामुळे कुणाची तरी ही खेळी असावी’.

    फुटीर खासदारांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘फुटीर खासदारांकडे लक्ष दिलं असतं तर त्यांच्या बऱ्याच भानगडी काढल्या असत्या. आता वरवर उपाययोजना करून चालणार नाहीत. त्यासाठी गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. गद्दार शिरोमणी मुंबईत असून मतदारांनी त्यांच्या उमदेवारांना ठरवून पाडलं पाहिजे. ही गद्दारीची कीड ठेचली पाहिजे. नाही तर भविष्यात लोकशाही वाचणार नाही. काही लोकांनी आईची शपथ घेतली होती. आता त्यांना शपथेची दुष्परिणाम दिसतील’.

    ‘फुटीर खासदार खासगी निधीसाठी गेलेत. त्यांचा खासदार फंड किती खर्च झाला. तो त्यांनी खर्च केलेला नाही. आमच्या अनिल देसाई, अरविद सावंत यांच्याकडे त्यांचा हजेरीपट आहे. फुटीरांनी किती वेळा लोकसभेत मतदारसंघाच्या प्रश्नावर तोंड उघडलं. त्यांनी किती वेळा संबंधित मंत्र्यांकडे जाऊन प्रश्न सोडवलाय, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif