शेअर आहे की रॉकेट….

अनिल अंबानींच्या स्टॉकमधील तेजी

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने सुसाट धावत आहेत. मागील तीन दिवसांत स्टॉक सुमारे 16 टक्क्यांनी वधारला असून बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, रिलायन्स पॉवर शेअर वरच्या सर्किटला धडकला आणि नव्य उच्चांकी किंमतीवर मुसंडी मारली. रिलायन्स पॉवर स्टॉकमधील तेजीच्या मागे एक डील असल्याचे कारण सांगितले जात आहे.

 

कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानींसाठी आनंदवार्ता आली आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स गेल्या तीन दिवसांपासून अप्पर सर्किट हिट करत असून भारताचे दुसरे अतिश्रीमंत गौतम अदानींची कंपनी अदानी पॉवरने नागपुरात औष्णिक ऊर्जा प्रकल्प खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केल्याची बातमी येताच अनिल अंबानींच्या शेअर्सना पंख फुटली. हा प्लांट विदर्भ पॉवर इंडस्ट्रीजचा भाग आहे जी रिलायन्स पॉवरची उपकंपनी आहे. तेव्हापासून रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी होताना दिसत आहे.

 

रिलायन्स पॉवरची उच्चांकी मजल

शेअर्समधील अलीकडच्या तेजीसह रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 14,529.38 कोटींवर पोहोचले आहे. रिलायन्स पॉवरचा आयपीओ जानेवारी 2008 मध्ये आला होता आणि गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 405 ते 4500 रुपये इश्यू किंमत होती. गुंतवणूकदारांनी रिलायन्सच्या या आयपीओला भरभरून प्रतिसाद मिळाला असून एकूण 70 पट बोली मिळाली तर लिस्टिंगच्या दिवशी 21 टक्के प्रीमियमसह 547.80 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांची निराशा झाली आणि 27 मार्च 2020 रोजी किंमत 1.13 रुपयांपर्यंत आपटली. मात्र, गेल्या चार वर्षांत रिलायन्स पॉवरच्या स्टॉकमधेय लक्षणीय वाढ झाली असून गेल्या वर्षभरात 115 टक्क्यांनी किंमत वधारली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.