IPL च्या कॉमेंट्रीमधून इरफान पठाणची हकालपट्टी

नेमकं काय आहे कारण ? , अखेर व्हिडीओ समोर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या कॉमेंट्रीवरुन इरफान पठाणची हकालपट्टी करण्यात आली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून इरफान पठाणला प्रत्येक मोठ्या क्रिकेट स्पर्धेत समालोचक म्हणून पाहिले जात आहे. पण यावेळी यादीत त्याचे नाव न दिसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

काही खेळाडूंवर वैयक्तिक टीका केल्याने इरफान पठाणला आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलवरुन वगळल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान इरफान पठाणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये इरफान पठाण भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीवर टीका करताना दिसत आहे. यामुळे बीसीसीआयने इरफान पठाणला आयपीलएच्या कॉमेंट्री पॅनलमधून वगळल्याचे बोलले जात आहे.

https://www.instagram.com/reel/DILWoGypi0w/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीशी संबंधित एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये इरफान पठाण विराट कोहलीवर टीका करताना दिसतोय. विराट कोहली घरगुती स्पर्धेमध्ये शेवटचा कधी खेळला होता तर एका दशकापूर्वी. पहिल्या डावामध्ये 2024 ला विराटची सरासरी 15 इतकी होती. वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात हवेत का? याचा विचार व्हायला हवा. याऐवजी एखाद्या तरुण खेळाडूला वारंवार संधी दिली तर तो सुद्धा 25-30 ची सरासरी देईल, असं इरफान पठाण या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतोय. दरम्यान, इरफान पठाणने रोहित शर्मावर देखील टीका केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.