Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»इराणने भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा केला खात्मा
    राष्ट्रीय

    इराणने भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा केला खात्मा

    एक दोन नव्हे तर अख्खी टीमच संपवली
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2026No Comments1,364 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमेरिका आणि इराणमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे. दोन्ही देश स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये आमने-सामने आहेत. दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा भारताला देखील सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र आता इराणमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे. इराणकडून भारताच्या शत्रूंचा खात्मा करण्यात आला आहे. इराणने आख्खी टीमच संपवली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इराणच्या सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील रास्क क्षेत्रात मोठी कारवाई केली आहे. इराणने जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण ऑपरेशन टीमचा खात्मा केला आहे.

    समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व दहशतवादी पाकिस्तानची सीमा ओलांडून इराणमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान इराणने सैन्य कारवाई करत या संघटनेतील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांच्या या गटाला इराणमध्ये जैश अल-जुल्म नावाने ओळखलं जातं. दरम्यान इराणकडून या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यामुळे आता इराण आणि पाकिस्तानमधील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

    इराणच्या वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टनुसार हा दहशतवाद्यांचा गट पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये असलेल्या रास्क परिसरातील पाकिस्तान इराण सीमा पार करुण इराणमध्ये घुसण्याच्या तयारीमध्ये होता. त्याचवेळी इराणने मोठी सैन्य कारवाई केली. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. या दहशतवादी संघटनेचं थेट पाकिस्तानच्या आएसआयशी कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. ही दहशतवादी संघटना आएसआयसाठी काम करते. दरम्यान याच दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी 2016 साली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचं इराणमधून अपहरण केलं होतं, त्यांना पाकिस्तानमध्ये नेण्यात आलं. कुलभूषण जाधव अजूनही पाकिस्तानच्या जेलमध्येच आहेत. या दहशतवाद्यांकडून वारंवार इराणच्या सैन्य दलावर तसेच सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांवर देखील हल्ले करण्यात आले आहेत. हे दहशतवादी वारंवार इराणमध्ये घुसखोरी करून, तेथील नागरिकांवर हल्ले करत असतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026

    गोंधळ करणाऱ्यांना हटकल्याने संगीतकाराची हत्या

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif