यंदाच्या IPL मधील हे बदल माहितीये का?

0

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

IPL ची वाट सर्वांनाच लागलेली आहे. आणि यावेळी IPL अनेक मोठ्या बदलांसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. यंदाचा आयपीएलचा 16वा सीजन खऱ्या अर्थाने वेगळा असणार आहे. कारण अनेक नवीन नियमांचा समावेश या आयपीएलचा असणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलमध्ये नियमांत महत्त्वाचा बदल केला आहे.कोणते नवीन नियम या आयपीएलमध्ये पाहायला मिळतील, ते जाणून घेऊया.
DRS नियमात बदल करण्यात आला आहे. प्रत्येक डावात दोन DRS असतील. वाईड आणि नो-बॉलवर खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकतील. महिला प्रीमियर लीग पहिल्यांदा याचा वापर झाला. मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर हा नवा नियम वापरणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
प्लेईंग इलेव्हनमधील एका खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर रिप्लेस करेल. यात इम्पॅक्ट प्लेअर या नियमामुळे सामन्याचं चित्र कधीही पालटताना दिसेल. कारण या नियमानुसार टॉसवेळी संघातील प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला कर्णधार सामन्यादरम्यान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करु शकेल. जो खेळाडू बदलला आहे तो खेळाडू मात्र पुन्हा सामन्यात खेळू शकणार नाही.
रिटायर्ड हर्ट प्लेअरच्या जागी इम्पॅक्ट प्लेअरही फलंदाजीला येऊ शकतो. दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात एक इम्पॅक्ट प्लेअर वापरू शकतात. जर संघात 4 परदेशी खेळाडू असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.