Sunday, November 27, 2022

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश…

- Advertisement -

 

- Advertisement -

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

मध्यप्रदेश, खांदेश, बुलढाणा जिल्ह्यांतून मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, संबंधित आरोपींना गजाआड करण्यास मलकापूर शहर पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांनी आज २९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली.

बुरहानपूर (मध्यप्रदेश), जळगाव खांदेश, मुक्ताईनगर, बुलढाणा याठीकानांहून मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. २१ जुलै रोजी द्वारकानगर मलकापूर येथील राम विजय राऊत यांची अज्ञात इसमाने शाईन ही दुचाकी गाडी चोरून नेल्याची फिर्याद मलकापूर शहर पो.स्टे.ला दिली होती. त्याअनुषंगाने शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी स्कॉडचे अधिकारी यांनी मोटार सायकलचा व आरोपींचा शोध गुप्तपणे घेत अट्टल मोटार सायकल चोर आकाश उर्फ संतोष रावळकर, रामशंकर मनोहर भोलनकर, पवन संजय जवरे, प्रशांत समाधान बोरले सर्व राहणार कुऱ्हा काकोडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव, अमरदिप बाबुराव उमाळे बहापुरा ता.मलकापूर, संतोष समाधान कवळे रा.आडविहीर ता.मोताळा यांना गजाआड केले.

या सर्वांनी मिळून राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटार सायकल चोरी करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या. त्यांच्याकडून सुमारे २१ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. ज्यामध्ये होंडा शाईन ५, सीडी ११० – २, एचएफ डिलक्स – ३, पॅशन ३, स्प्लेंडर प्रो व प्लस ५,  होंडा युनिकॉन १, होंडा अ‍ॅक्टीवा १, ड्रिमयुगा १ अशा एकूण १२ लाख ६० हजार रूपये किमतीच्या २१ मोटार सायकल गाड्या जप्त करण्यात आल्या.

या चोरट्यांनी जळगाव खांदेश एमआयडीसी, भुसावळ बाजारपेठ, मुक्ताईनगर, मलकापूर, मलकापूर एमआयडीसी, नांदुरा, खामगाव, शेगाव, वर्धा शहर याठिकाणी चोरी केल्याची कबुली देवून त्याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी त्यागी यांनी दिली.

सदर कारवाई जिपोअ. अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी, शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पो.स्टे. चे डीपी पथक अधिकारी स.पो.नि सुखदेव भोरकडे, पो.उप.नि बालाजी सानप, पो.हे.कॉ मुंडे, पो.कॉ ईश्वर वाघ, पो.कॉ संतोष कुमावत, गोपाळ तारुळकर, अनिल डागोर, आसिफ शेख, सलीम बर्डे, प्रमोद राठोड यांनी केली. पुढील तपास सपोनि सुखदेव भोरकडे हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या